किंगमेकर
किरण सामंत
किरण सामंत हे पेशानं इंजिनिअर आहेत. बांधकाम हा त्यांचा वडिलोपार्जित व्यवसाय. सध्या किरण सामंत वडिलांचा बांधकामाचा व्यवसाय सांभाळत आहेत. शिवाय, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांमध्ये त्यांचा संवाद देखील चांगला आहे.
कोकणातील राजकीय समीकरणांवर काय परिणाम होईल?
सध्या किरण सामंत यांच्या सक्रिय राजकारणातील प्रवेशाची केवळ चर्चा आहे. किरण सामंत हे आमदारकी लढवणार किंवा खासदारकी लढवणार? याबाबत अद्याप स्पष्टता नाही. पण, किरण सामंत यांच्या सक्रीय राजकारणातील प्रवेशानं मात्र कोकणातील गणितं काही प्रमाणात बदलू शकतात असा मानणारा देखील एक वर्ग आहे. शिवाय, किरण सामंत यांचे सर्वपक्षीयांशी संबंध हे चांगले आहे. त्यामुळे आता सत्तांतर झाल्यानंतर शिवसेनेचं वर्चस्व असलेल्या कोकणात आगामी काळात राजकीय उलथापालथी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.





कोकणच्या विकासाला गती देण्यासाठी आणि येथील तरुणांना रोजगार देण्यासाठी लवकरात लवकर रिफायनरी प्रकल्प होणे गरजेचे असल्याचे मत उद्योजक किरण सामंत यांनी व्यक्त केले आहे. उद्योजक किरण सामंत यांची नुकतीच सिंधुरत्न समृद्ध योजनेच्या कार्यकरी समितीवर निवड झाली आहे.
सिंधुरत्न समृद्ध योजनेच्या माध्यमातून सिंधुदुर्ग व रत्नागिरी या दोन जिल्ह्यांतील उपलब्ध नैसर्गिक साधनसंपत्ती व विकासक्षेत्रांची निवड करून त्या क्षेत्रांचा सूक्ष्म आराखडा तयार करणे व त्या आधारे परिणामकारक अंमलबजावणी करून पर्यावरणक्षम शाश्वत विकास घडवणे हा या योजनेचा उद्देश आहे. लवकरात लवकर कोकणात रिफायनरी प्रकल्प कार्यन्वित झाला तर मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होऊन तरुणांना नोकऱ्या मिळतील. म्हणूनच हा प्रकल्प पूर्णत्वाला नेण्यासाठी उद्योजक किरण सामंत यांनी कंबर कसली असून या प्रकल्पाला कोकणातून पूर्ण समर्थ
